सन २०११-१२ पासून ७ वी रयत प्रज्ञा शोध, ५ वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती, ८ वी पूर्व माध्यमिक शिष्यवृती, ८ वी एन.एम.एम.एस., ८ वी रयत ऑलिम्पियाड या स्पर्धा परीक्षांच्या विदयार्थ्यांना मार्गदर्शन
इ. ८ वी "पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा" या परीक्षेसाठी 'ध्येय एकच: स्कॉलरशिप'
या प्रश्नपत्रिका संग्रहाचे प्रकाशन दि. ११.१०.२०१८ रोजी
जनरल बॉडी सदस्या, रयत शिक्षण संस्था, सातारा व
आमच्या विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीच्या
अध्यक्षा मा. विभावरीताई सणस यांच्या हस्ते प्रकाशन
इ. ७ वी "रयत प्रज्ञा शोध परीक्षा" या परीक्षेसाठी 'ध्येय एकच: आर.टी.एस.'
या प्रश्नपत्रिका संग्रहाचे प्रकाशन दि. १४.१.२०१९ रोजी
मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व साधना विद्यालयाचे प्राचार्य
मा. अजित अभंग साहेब यांच्या हस्ते प्रकाशन
सन २०१५-१६ मध्ये रयत ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये खवले ऋषिकेश या विद्यार्थ्याला विशेष मार्गदर्शन
त्यामुळे त्याच्या संशोधनात्मक प्रकल्पाचा संस्थेत १९ वा व पुणे विभागात प्रथम क्रमांक,
या विद्यार्थ्याला १० वी पर्यंत शिष्यवृती
सन २०१४-१५ मध्ये ७ वी रयत प्रज्ञा शोध परीक्षेत
खवले ऋषिकेश व माळी केतन
या दोन विद्यार्थ्यांना १० वी पर्यंत शिष्यवृत्ती
सन २०१४-१५ मध्ये ७ वी माध्यमिक शिष्यवृती परीक्षेत खवले ऋषिकेश व मुटके प्रथमेश या दोन विद्यार्थ्यांना शहरी गुणवत्ता यादीमधून शिष्यवृत्ती
सन २०१६-१७ मध्ये ५ वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षेत
ढवळे ओम, दळवी मानस व चंदनशिव हर्षवर्धन
या तीन विद्यार्थ्यांना शहरी गुणवत्ता यादीमधून शिष्यवृत्ती
८ वी एन.एम.एम.एस. परीक्षेत २०१५-१६ मध्ये
अंबिके अथर्व व खवले ऋषिकेश या दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती