रयत शिक्षण संस्थेचा पहिला ‘कार्यक्षम गुरुकुल प्रमुख’ पुरस्कार दि. ४.१०.२०१५ रोजी सातारा येथे.
प्रकल्पाचे सर्व नियोजन व कार्यवाही
सर्व वर्गांच्या क्षेत्रभेटींचे नियोजन व कार्यवाही
सर्व वर्गांसाठी बाह्य तज्ञ व्याख्यानांचे नियोजन व कार्यवाही
अत्याधुनिक अशा सहा डिजिटल क्लासरूमची उभारणी
विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी लॉकर
वर्गग्रंथालयाची उभारणी
विद्यार्थ्यांच्या लेखन व चित्रकलेला वाव देण्यासाठी प्रत्येक वर्गात ७ फ्लॅनेल बोर्ड व प्रत्येक वर्गाचे हस्तलिखित करण्याचे दरवर्षी नियोजन
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उन्हाळी व हिवाळी शिबिरांचे आयोजन
गणित खेळणी व विज्ञान खेळणी कार्यशाळांचे आयोजन
सामाजिक जाणीवजागृतीसाठी अंधश्रद्धा निर्मुलन कार्यशाळा
गुरुकुलच्या सर्व डिजिटल वर्गांचा मेंटेनन्स
वेळोवेळी पालकसभा घेऊन पालकांचे प्रकल्पाच्या दृष्टीने उद्बोधन
संस्थेच्या व शासकीय स्पर्धापरीक्षा यांना गुरुकुलचे जास्तीत जास्त विद्यार्थी प्रविष्ट व्हावेत व गुणवत्ता व शिष्यवृती प्राप्त होण्यासाठी विद्यार्थ्याना सतत मार्गदर्शन
रयत गुरुकुल प्रकल्पाच्या २०१६-१७ च्या १० वीच्या वर्गाला उद्बोधन करून त्यांच्याकडून गणित प्रयोगशाळेसाठी वर्गणी काढण्याचा प्रस्ताव मांडला. सर्व विद्यार्थ्यांनी ८०००/- रू. वर्गणी जमा केली. त्यामधून गणित प्रयोगशाळेसाठी आवश्यक फर्निचर तयार करून घेतले. रंगकाम करून घेतले. प्लास्टिकचे ४८ डबे खरेदी केले. ९ वीच्या विद्यार्थ्यांकडून आवश्यक गणित खेळणी कार्यशाळा आयोजित करून तयार करून घेतली.
१.१.२०१८ रोजी शिक्षण विस्तार अधिकारी मा. नितीन धानापुने साहेब यांच्या उपस्थितीत याच विद्यार्थ्यांनी Language Lab साठी ५०००/-रू. देणगी दिली आहे.